Pimpri news: पुण्यापाठोपाठ शहरातीलही शाळा 30 नोव्हेंबरपर्यंत बंदच राहणार

Pimpri news: पुण्यापाठोपाठ शहरातीलही शाळा 30 नोव्हेंबरपर्यंत बंदच राहणार

Pckhabar-कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आणि शिक्षकांची कोरोना चाचची पूर्ण झाल्या नसल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सोमवारपासून सुरू होणार नाहीत. 30 नोव्हेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. याबाबतचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर काढणार आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनलॉकमध्ये मिशन बिगीन अगेन अंतर्गत येत्या सोमवार (23) पासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याचे नियोजन सरकारने केले होते. मात्र, दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाने शहरातील परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याच्या सूचना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या होत्या. मुंबई, पुणे महापालिकेने शाळा चालू न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पिंपरी पालिकेनेही शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *