Pimpri Corona News: शहरातील कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण दहा टक्क्यांवर – आयुक्त हर्डीकर
Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कोरोना संसर्ग कमी झाला आहे. पॉझिटिव्हचे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत कमी झाले असून ते कमी करण्यासाठी नागरिकांनी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

आयुक्त हर्डीकर म्हणाले, दिवाळी काळात बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली होती. ऋतुमानामध्येही बदल झाला आहे. हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. लक्षणे दिसताच तत्काळ कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. हिवाळ्यात रुग्णसंख्या वाढली तर सुरक्षितता म्हणून आयसीयू व ऑक्सिजनयुक्त यंत्रणा सज्ज ठेवलेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील 33.9 टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडीज विकसित!
मार्चपासून शहरातील 90 हजारहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 87 हजार जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, शहरातील 33.9 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे. सुमारे साडे आठ लाख नागरिकांमध्ये अँटिबॉडीज (प्रतिपिंड) विकसित झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव फारसा नसेल. पण, काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply