Pimpri Corona News: सावधान कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय! आज 164 नवीन रुग्णांची नोंद
142 जणांना डिस्चार्ज, आठ मृत्यू
Pckhabar- चाचण्या वाढल्या नसतानाही पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मागील चार दिवसात 596 रुग्णांची वाढ झाली आहे. शहराच्या विविध भागातील 164 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 142 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 90 हजार 289 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 86 हजार 998 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1582 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 655 अशा 2237 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 631 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 927 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील पाच आणि पालिका हद्दीबाहेरील तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पिंपरीतील 67 वर्षीय पुरुष, कासारवाडीतील 57 वर्षीय पुरुष, वाकड मधील 45 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 50 वर्षीय पुरुष, भोसरीतील 75 वर्षीय वृद्ध महिला, आंबेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, राजगुरुनगर येथील 70 वर्षीय पुरुष, खेड मधील 75 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply