Pimpri news : शहरात अवकाळी पावसाची हजेरी
Pckhabar- गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडी गायब झाली होती. तर दोन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. शुक्रवारी दुपारनंतर शहरात उकाडा वाढला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक काळे ढग दाढून आले. आणि सव्वा सहाच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. मात्र, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

गेल्या काही दिवसांपासून शहरात थंडी गायब झाली होती. तर दुपारनंतर उकडत होते. त्यामुळे हिवाळा आहे की उन्हाळा असा प्रश्न नागरिकांना पडत होता. गुरूवारीही मावळातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तर शुक्रवारी दुपारपासून उकाडा वाढला होता. सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने कार्यालयातून घरी जाणार्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.











Leave a Reply