‘शाळा सुरू करण्याचा निर्णय अविचारी’
Pckhabar- कोरोनाचा प्रादूर्भाव अद्यापही पुर्णतः कमी झाला नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय अविचारी असून सरकारने शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत पुन्हा विचार करण्याची मागणी दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष दुर्गा भोर यांनी शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

शिक्षण मंत्री सामंत यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने 23 नोव्हेंबर रोजी शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अनेक विद्यार्थी सार्वजनिक वाहनांचा शाळेत जाण्यासाठी वापर करतात. त्या वाहनांमध्ये एकाच वेळी चार ते पाच विद्यार्थी किंवा बसमध्ये अनेक विद्यार्थी बसविले जातात. अशा विद्यार्थ्यांसाठी ट्रान्सपोर्ट सुविधा शासनाने कोणत्या प्रकारे निर्माण केली आहे. त्याचे स्पष्ट संकेत अजून दिलेले नाहीत. अनेक विद्यार्थ्यांचे पालक ही नोकरीनिमित्त बाहेर असतात. या मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी आणि येण्यासाठी कोणत्या सुविधा आणि त्या सुविधा खरच सुरक्षा देणार्या असतील का हा सुद्धा एक संभ्रम आहे.

शाळा सुरू करताना राज्य सरकारच्या काही अटी संभ्रमात टाकणारे असून त्यामुळे पालक आणि शाळा यांच्यामध्ये अनेक वादाचे प्रसंग उभे राहू शकतात. गरीब विद्यार्थ्यांवर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन त्यांच्या जीवाशी खेळण्याचा खेळ थांबवावा, असे दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दुर्गा भोर यांनी म्हटले आहे.
शाळेत येताना विद्यार्थ्यांनी पालकांची सहीनिशी संमती बंधनकारक असून सर्व जबाबदारी पालकांवर सोपविलेली दिसत आहे. सध्या अनेकजण कोरोनाच्या सूचनांचे गांभीर्याने पालन करत नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमाला पन्नास लोकांची परवानगी असताना शाळेमध्ये मात्र अनेक वर्गांमध्ये विद्यार्थी एकाच रूममध्ये शिक्षण घेताना अनेक धोके निर्माण होऊ शकतात.
कोरोनाची दुसरी साथ येण्याची शक्यता सरकारतर्फे बोलून दाखविली जात आहे. असे असताना शाळा सुरू करून विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा निर्णय घेणे म्हणजे अत्यंत चुकीचा आहे. सरकारने याबाबत पुनर्विचार करून निर्णय घेण्याची मागणी दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या वतीने शिक्षणमंत्र्यांना करण्यात आली आहे.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply