Pimpri corona News: शहरात आज 158 नवीन रुग्णांची नोंद, 95 जणांना डिस्चार्ज, चार मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 158 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 95 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 89 हजार 946 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 86 हजार 773 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1573 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 651 अशा 2224 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 631 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1188 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील चार जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये यमुनानगर येथील 85 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 70 वर्षीय पुरुष, भोसरीतील 78 वर्षीय पुरुष आणि च-होलीतील 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply