Lonavala news : तुंगार्ली धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात तिसऱ्या दिवशी यश

 

Lonavala news : तुंगार्ली धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात तिसऱ्या दिवशी यश
Pckhabar- सोमवारी भाऊबीजेच्या दिवशी तुंगार्ली धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह अखेर तिसऱ्या दिवशी बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या बचाव पथकाला यश आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार अमित देवीदिन गुप्ता (वय २३, रा. शांतीनगर, तुंगार फाटा, वसई) असे या युवकाचे नाव आहे. अमित आणि त्याचे तीन भाऊ आणि तसेच त्यांचे इतर चार मित्र असे एकूण ८ जण लोणावळा शहरात फिरण्यासाठी आले होते. येथून ते राजमाची किल्ल्यावर जाणार होते. मात्र रस्त्यात तुंगार्ली धरण लागल्याने हे सर्व मित्र या ठिकाणी थांबले. दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास अमित आणि आणखी एक जण धरणाच्या पाण्यात उतरले असता अमित हा पाण्यात बुडू लागला. इतरांनी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना अपयश आले.

सदर माहिती समजताच स्थानिक शिवदुर्ग बचाव पथकाने अमित याचा शोध सुरू केला. मात्र दोन दिवसांच्या प्रयत्नानंतरही अमित याचा काहीही तपास लागला नाही. अखेर बुधवारी एनडीआरएफ ला पाचारण करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता एनडीआरएफ बचाव पथक दाखल झाल्यावर एनडीआरएफ आणि शिवदुर्ग यांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली. अखेर दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास अमित याचा मृतदेह आढळून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *