Lonavala news : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटात दुधाचा टँकर पलटी; एक ठार

 

Lonavala news : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटात दुधाचा टँकर पलटी; एक ठार
Pckhabar-  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा दुधाचा टँकर पलटी झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.

 

    मिळालेल्या माहितीनुसार दुधाची वाहतूक करणारा टँकर क्र. (MH12HD7299) हा मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे टॅकर पलटी होऊन जवळपास पन्नास फूट फरफटत गेला. या अपघातात टँकरमधील एकाचा मृत्यू झाला. 


    टँकर हा महामार्गावरील मिडल लाईनवर पलटी झाल्याने रात्री  मुंबईकडे जाणारी एक लेन बंद केली होती. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळावर धाव घेतली. टँकर बाजुला केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *