Pimpri Corona News: शहरात आज 95 नवीन रुग्णांची नोंद, 61 जणांना डिस्चार्ज, आठ मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 95 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 61 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 89 हजार 788 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 86 हजार 678 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1569 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 651 अशा 2220 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 621 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1006 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील पाच आणि पालिका हद्दीबाहेरील तीन अशा आठ जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चिंचवड येथील 70 वर्षीय वृद्ध, रावेत मधील 69 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 70 वर्षीय वृद्ध, भोसरीतील 62 वर्षीय पुरुष, यमुनानगर येथील 63 वर्षीय पुरुष आणि नारायणगाव येथील 65 वर्षीय पुरुष, कोथरुड येथील वर्षीय पुरुष, चाकण येथील 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply