Dehu news : ‘एक दिवा सैनिकांसाठी’ या उपक्रमात उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे यांचा सहभाग

Dehu news : ‘एक दिवा सैनिकांसाठी’ या उपक्रमात उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे यांचा सहभाग
Pckhabar- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ‘एक दिवा सैनिकांसाठी’ लावावा, असे देशवासीयांना आवाहन केले होते. या आवाहनाला साद देत देहूगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे यांनी सहभाग घेत दिवा लावून
सैनिकांप्रति आदर व्यक्त केला.

देशाच्या संरक्षणासाठी जिवाची बाजी लावत सिमेवर रक्षण करणाऱ्या जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली. तसेच देशातील जनतेला सैनिकांसाठी एक दिवा लावण्याचे आवाहन केले होते.

याबाबत उपसरपंच स्वप्नील आप्पा काळोखे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सैनिकांसाठी एक दिवा या उपक्रमात सहभागी होऊन आनंद होत आहे. आपण सर्व जण दिवाळी साजरी करत असताना सैनिक सिमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहेत. सैनिकांमुळे आपण मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करू शकत आहेत’.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *