Dighi news : दिघीत सामाजिक संस्थाकडून महिला सफाई कर्मचारी आणि भाजी विक्रेत्या महिलांना दिवाळी भेट वस्तूचे वाटप
Pckhabar-दिघी विकास मंच, वसंत रेंगडे, दिलीप दंडवते मित्र परिवार, श्रावणी महिला बचत गट , विकी अकुलवार मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दिघीतील आरोग्य विभागात काम करणाऱ्या सफाई महिला, पुरुष कर्मचारी तसेच भाजी विक्री करणा-या महिलांना दिवाळी भेट म्हणून साडी-चोळी, फराळ, किराणा वस्तूचे किट वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत रेंगडे यांनी केले. दिघी विकास मंचाची स्थापना व संस्थेच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंचाचे हरिभाऊ लबडे होते. यावेळी कार्यध्यक्ष योगेश अकुलवार, उपाध्यक्ष धनाजी खाडे, सहखजिनदार नामदेव रढे, सदस्य सुनील काकडे, पुंडलिक सैंदाने, सुखदेव वानखडे, पांडुरंग म्हेत्रे सर, राजेंद्र राऊत, अभिमन्यू दोरकर, संजय बांबळे, रमेश विरणक, आनिल भोजने, प्रतिभा दोरकर, कल्पना पाटिल, विमल दंडवते, स्वाती लबडे, ज्ञानेश आल्हाट, राहुल राजगुरू सर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंचाचे सचिव समाधान कांबळे यांनी केले. मंचाचे खजिनदार दत्ता घुले यांनी आभार मानले.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)












Leave a Reply