Pimpri corona News: शहरात आज 98 रुग्णांची नोंद, 72 जणांना डिस्चार्ज, तीन मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 98 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 72 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 89 हजार 381 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 86 हजार 347 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1559 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 645 अशा 2204 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 643 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1089 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील एक आणि पालिका हद्दीबाहेरील दोन अशा तीन जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दिघीतील 57 वर्षीय पुरुष आणि महापालिका हद्दीबाहेरील परंतु पालिका रुग्णालयात उपचार घेत असताना सोलापूर येथील 60
वर्षीय पुरुष, आळंदी येथील 86 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply