Pimpri news : मोजमाप परिमाणे ‘चार्टचे अनावरण व वितरण’

Pimpri news : मोजमाप परिमाणे ‘चार्टचे अनावरण व वितरण’
Pckhabar-लायन्स क्लब्स इंटरनॅशनलच्या कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत लायन्स क्लब ऑफ पूना निगडी,पुणे आकुर्डी व प्रेरणा कौशल्य विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  “मोजमाप परिमाणे” चार्टचे अनावरण व वितरण नुकतेच करण्यात आले.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज आणि ऍग्रीकलचरचे व्हाइस प्रेसिडेंट दीपक करंदीकर यांच्या हस्ते एम आय डी सी मधील 25 कंपन्यांना करण्यात आले. नवीन शैक्षणिक धोरणातील कौशल्य विकासाचे महत्व त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. लायन्स करीत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी प्रांतपाल एम जे एफ लायन ओमप्रकाश पेठे हे उपस्थित होते. लायन पेठे यांनी लायन्स क्लब्स इंटरनॅशनलच्या कौशल्य विकास अंतर्गत होणाऱ्या उपक्रमांची माहिती सांगितली व त्यामुळे क्रमिक शिक्षण व औद्योगिक अपेक्षा यातील तफावत कमी होण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले.

लायन्स क्लब ऑफ पूना निगडी क्लबचे अध्यक्ष लायन मारुती मुसमाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या उपक्रमाचे आयोजन, नियोजन व सूत्रसंचालन एम जे एफ लायन अशोक येवले यांनी केले. सभेचा समारोप लायन दुर्गाशंकर बेहेरा व लायन ऋषिकेश मुसमाडे यांनी केला.

या प्रसंगी लायन मनोज चोपडे, एक्सपोनेंशीयलचे पदाधिकारी, अभियंता व एम आय डी सी मधील कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुरक्षितता व सुरक्षित अंतर सांभाळून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मास्कचा वापर अनिवार्य केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *