Pimpri Coron News: शहरात आज 125 रुग्णांची नोंद, 105 जणांना डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू

Pimpri Coron News: शहरात आज 125 रुग्णांची नोंद, 105 जणांना डिस्चार्ज, दोघांचा मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 125 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 105 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 89 हजार 111 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 86 हजार 140 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1553 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 641 अशा 2194 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 668 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1153 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील दोघांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रहाटणीतील 70 वर्षीय पुरुष आणि पिंपळेसौदागर येथील 63 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *