Pimpri corona News:  शहरात आज 108 रुग्णांची नोंद, 151 जणांना डिस्चार्ज, 6 जणांचा मृत्यू

Pimpri corona News:  शहरात आज 108 रुग्णांची नोंद, 151 जणांना डिस्चार्ज, 6 जणांचा मृत्यू
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 151 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 151 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 88 हजार 986 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 86 हजार 35 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1551 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 641 अशा  2192 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 732 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 689 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील चार आणि पालिका हद्दीबाहेरील दोन अशा सहा जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चिंचवड येथील 75 वर्षीय पुरुष, आकुर्डीतील 41 वर्षीय पुरुष, निगडी 64
वर्षीय पुरुष, भोसरीतील 66 वर्षीय पुरुष आणि महापालिका हद्दीबाहेरील परंतु पालिका रुग्णालयात उपचार घेत असताना देहूगाव येथील 54 वर्षीय पुरुष, शिरूर येथील 64 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *