pimpri corona news: शहरात आज 79 रुग्णांची नोंद, 409 जणांना डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

 pimpri corona news: शहरात आज 79 रुग्णांची नोंद, 409 जणांना डिस्चार्ज, एकाचा मृत्यू

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 76 आणि पालिका हद्दीबाहेरील 3 अशा 79 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 409 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 88 हजार 878 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 85 हजार 884 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1547 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 639 अशा  2186 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 760 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 966 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील आज आकुर्डीतील 66 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. काल शहरातील एकाचाही मृत्यू झाला नव्हता. शहरातील मृत्यूचे प्रमाणही कमी होत आहे. हे मोठे आशादायक चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *