Pimpri news : वल्लभनगर एस.टी. आगारातून दिवाळीसाठी जादा बस

Pimpri news : वल्लभनगर एस.टी. आगारातून दिवाळीसाठी जादा फेर्‍या
Pckhabar- नागरिकांना दिवाळीसाठी गावी जाता यावे म्हणून पिंपरीतील वल्लभनगर एसटी आगारातून जादा बस सोडण्यात येणार आहेत. सध्या वल्लभनगर आगारातून 85 टक्के मार्गावर बस धावण्यास सुरुवात झाली आहे. वीस नोव्हेंबर पर्यंत जादा बस सुटणार आहेत.
कोल्हापूर, सोलापूर, लातूर, अकोला, नाशिक, औरंगाबाद, चिपळूण, दापोली या भागात जाणार्‍या प्रवाशांची संख्या आणि प्रतिसाद बघून वेळेवर अतिरिक्त बसचे नियोजन नियोजन करण्यात आले आहे. सध्या दररोज 30 ते 40 फेर्‍या सुरू आहेत. त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे.
तसेच, 40 प्रवाशांची संख्या असल्यास ग्रुप बुकिंगची सुविधा देण्यात आली आहे. आरक्षित तिकिटाची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. सध्या तरी महामंडळाकडून कोणताही दरवाढ करण्यात आलेली नाही. कोरोनामुळे मार्चपासून ते सप्टेंबरपर्यंत महामंडळाच्या बस बंद होत्या. त्याचा मोठा आर्थिक फटका महामंडळाला बसला आहे. आता दिवाळीच्या निमित्ताने एसटीचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *