Talegaon Dabhade news : दिवाळीची खरेदी करून घरी जाणारी महिला कंटेनरच्या धडकेत ठार

Talegaon Dabhade news : दिवाळीची खरेदी करून घरी जाणारी महिला कंटेनरच्या धडकेत ठार
Pckhabar- दिवाळीची खरेदी करून मुलीसह दुचाकीवरून जाणार्‍या   कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने महिलेचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना तळेगाव स्टेशन चौकात रविवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली. कंटेनर चालकाला पोलिसांनी अटक केली.
कालिता संतोष तोरकडे (वय-37, रा. कान्हे फाटा, मावळ) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. रवि कमल सिंग (वय-31, रा. धुळे) असे अटक केलेल्या आरोपी कंटनेर चालकाचे नाव आहे. याप्रकरणी देविका संतोष तोरकडे (वय-20) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देविका आणि तिची आई कालिता या रविवारी दिवाळीची खरेदी करून दुचाकीवरून घरी जात होत्या. तळेगाव स्टेशन चौकात कंटेनर (एचआर. 55 वाय 7342) ने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन कालिता यांचा मृत्यू झाला. तळेगाव पोलिसांनी आरोपी कंटेनर चालकाला त्वरीत अटक केली. फौजदार गवारी तपास करत आहेत.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)