chinchwad news : फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प

chinchwad news : फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प

Pckhabar- चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलच्यावतीने गेली दहा वर्षांपासून प्रदूषणमुक्त दिवाळी सण साजरी करावी, यासाठी समाजप्रबोधन करीत आहे.

यंदाच्या वर्षी कोरोना संसर्गजन्य संकटाच्या पार्श्वभूमीवर कमला शिक्षण संकूल संचलित प्रतिभा महाविद्यालयाचे संस्थापक सचिव डॉ. दिपक शहा, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना (प्रांत 3234 डी 2) लायन्स क्लब ऑफ तळेगावच्या अध्यक्षा प्रमिला वाळुंज, अभय शास्त्री, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबत बैठक घेण्यात आली. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरीकांकडून दिवाळी सणानिमित्त फटाके न उडविण्याचे प्रतिज्ञापत्र ऑनलाईन एक लाख गुगल फॉर्मद्वारे भरण्याचा संकल्प राबविण्यात येणार असल्याचे प्रतिभा गु्रप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शहा यांनी यावेळी सांगितले.

दिवाळी सणात फटाक्यांमुळे हवेत प्रचंड प्रदुषण होते, वातावरण दुषित होते. अनेक आजार, अपघात, भाजणे, आग लागणे असे प्रकार घडतात काहीवेळा आपणच निमंत्रण देत असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यंदाच्यावर्षी कोरोनाचे रुग्ण आता कमी प्रमाणात आढळत असले तरी, येणार्‍या थंडीमुळे इतर देशात कोरोना रुग्ण वाढत आहेत. आपल्याकडे देखील थंडी वाढत आहे. आपण प्रत्येकाने सावधगिरी बाळगत फटाके विरहीत साधेपणाने दिवाळी सण साजरी करून आपल्या श्वसन संस्थेचे प्रदुषण होणार नाही, याची प्रत्येक नागरिकांने दक्षता घेण्याची आज आवश्यकता आहे. शालेय मुलामुलींचा उत्साह घरोघरी असला. तरी, पालक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संकल्प केला तर कोरोनाचा प्रादुर्भाव दूर ठेवता येईल. प्रदुषणविरहीत सण साधेपणाने साजरी करता येईल. आज घरोघरी जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. दिवाळी सणात फटाके न उडविण्याचे प्रतिज्ञापत्र ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही कल्पना अभिनव असून प्रत्येकाने आपापल्या व्हॉट्सअ‍ॅप गु्रपमधून आपले, नातेवाईक, मित्रमंडळींना माहिती शेअर केली तर, जनजागृती मोठ्या प्रमाणात होईल. तसेच शहरातील स्वयंसेवी, सामाजिक, शैक्षणिक इतर संघटना, गृहसंकुलाचे पदाधिकारी यांना देखील ‘फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी’, ‘कोरोनाचा नायनाट करावा’ हा संदेश डॉ. दीपक शहा यांनी यावेळी दिला.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *