Talegaon news : आदिवासी महिलांना दिवाळी फराळ आणि साड्यांचे वाटप
Pckhabar- तळेगाव येथील विरांगना महिला विकास संस्थेच्या वतीने राजमाची येथील आदिवासी कुटुंबातील महिला भगिनींना दिवाळी सणाच्या निमित्ताने दिवाळी फराळ आणि साड्यांचे वाटप करण्यात आले.
विरांगना महिला विकास संस्था ही महिलांच्या विकासासाठी काम करणारी संस्था आहे. महिलांना वेगवेगळे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय उभा करून देण्यासाठी ही संस्था कार्यरत असते. कोरोना लॉकडॉउन मध्ये आर्थिक कंबरडे मोडलेल्या आणि नंतर झालेल्या निसर्ग चक्री वादळाचा तडाखा सहन केलेल्या राजमाची गावातील आदिवासी महिलांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने विरांगना संस्थेच्या वतीने राजमाची गावात सदर कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष निलिमा दाभाडे, सदस्य रजनी ठाकूर, शैलाजा काळोखे, सविता गावडे, विना दाभाडे, नेहा गराडे, सोनाली शेलार, ज्योती दाभाडे, राजमाची गावच्या सरपंच प्रगती वरे, ग्रामपंचायत सदस्य दीपिका उंबरे यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










Leave a Reply