America news : जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष

America news : जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष
Pckhabar- संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडन निवडून आले आहेत. याबाबत अमेरिकन आणि युरोपीय माध्यमांनी जो बायडन जिंकल्याचं जाहीर केलं आहे. बायडन यांनी 284 तर ट्रम्प यांना 214 पर्यंतच मजल मारता आली.

बराक ओबामा अध्यक्ष असताना बायडन हे उपाध्यक्ष होते. 2015मध्ये त्यांचा मुलगा बियू याचा ब्रेन कॅन्सरने मृत्यू झाला होता. तर दुसरा मुलगा हंटर याला कोकेन बाळगल्या प्रकरणी नौदलातून काढून टाकण्यात आलं होतं. 1988मध्ये ते अर्धांग वायूच्या आजारातूनही बाहेर आले. अशा अनेक संकटावर मात करत आता बायडेन यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे.

कोळशांच्या खाणी आणि मोठ मोठाली यंत्र यांच्या सहवासात त्यांचं बालपण कष्टात गेलं होतं. लहान असताना बोलण्यात ते अडखळत असत. त्यामुळे शिक्षकांनी त्यांचा अपमानही केला होता. नंतर त्यांनी भाषेवर प्रभुत्व मिळवलं. ‘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *