Pimpri corona News: शहरातील रुग्णसंख्या शंभरच्या आत, आज 97 रुग्णांची नोंद
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या शंभरच्या आतमध्ये आली आहे. शहराच्या विविध भागातील 97 आणि पालिका हद्दीबाहेरील 1 अशा 98 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 161 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 88 हजार 678 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 85 हजार 374 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1544 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 639 अशा 2183 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 79प सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 757 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील 4 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात जुनी सांगवीतील 85, 45 वर्षीय दोन पुरुष, काळेवाडीतील 70 वर्षीय पुरुष आणि निगडीतील 69 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply