Lonavala news : पर्यावरण विषयक अभियान माहिती संकलनासाठी नगरपरिषदेद्वारे स्‍वतंत्र कक्ष स्‍थापन

 

Lonavala news : पर्यावरण विषयक अभियान माहिती संकलनासाठी नगरपरिषदेद्वारे स्‍वतंत्र कक्ष स्‍थापन
Pckhabar- केंद्र सरकारचे स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२१ व महाराष्‍ट्र शासनाचे माझी वसुंधरा अभियान अशा दोन पर्यावरण विषयक अभियानाची माहिती संकलित करणेकरीता लोणावळा नगरपरिषदेकडून एका स्‍वतंत्र कक्षाची स्‍थापन करण्यात आली आहे. नगराध्‍यक्षा सुरेखा जाधव, यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

या अभियानातंर्गत नगरपरिषदेच्या वतीनं आयोजीत केलेल्‍या पोस्‍टर, म्‍युरल, जिंगल, शॉर्ट मुव्‍हीज स्‍पर्धेत स्पर्धकांकडून जमा करण्यात आलेल्या साहित्‍याची पाहणी यावेळी करण्‍यात आली. यावेळी नगराध्यक्षा जाधव यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक श्रीधर पुजारी, मुख्‍याधिकारी रवि पवार, नगरसेवक राजू बच्‍चे, मा.नगरसेवक बाळासाहेब जाधव,विभागाचे नोडल ऑफीसर व शहर अभियंता एम.एच.पाटील, उपमुख्‍याधिकारी डॉ.भगवान खाडे व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

नगरपरिषदेने घेतलेल्‍या या सर्व स्‍पर्धाचे निकाल जाहीर करुन बक्षीस समारंभ घेण्‍यात येणार आहे. तसेच दि.६ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत स्‍वच्‍छ हॉटेल, सोसायटी, शाळा, मार्केट, ऑफीसेस या स्‍पर्धाचे आयोजन करण्यात आले असून या स्‍पर्धेतही नागरिकांनी भाग घ्‍यावा आणि येणारी दिवाळी ही पर्यावरणपूरक पध्‍दतीने साजरी करावी असे आवाहन नगराध्‍यक्षा सुरेख जाधव आणि मुख्‍याधिकारी रवि पवार यांनी सर्व नागरिकांना केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *