जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या सभा मंडपाचे लोकार्पण

 

जिल्हा परिषद सदस्या शैलाताई खंडागळे यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या सभा मंडपाचे लोकार्पण

Pckhabar- पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या सदस्या शैलाताई खंडागळे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या सभा मंडपाचे लोकार्पण वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल टिंगरे, सदस्या शैलाताई खंडागळे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.

तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला वडगाव शिंदे ग्रामपंचायत गावठाण रस्त्याचे भूमिपूजन आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शैलाताई खंडागळे, वडगाव शिंदे ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमाताई शिंदे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या रस्त्याच्या कामासाठी पीएमआरडीकडून  सुमारे 85 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या शैलाताई खंडागळे म्हणाल्या, नागरिकांच्या सोईसाठी प्रशस्त असा सभा मंडप उभारण्यात आला आहे. त्याचा नागरिकांनी व्यवस्थित वापर करावा. तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला वडगाव शिंदे ग्रामपंचायत गावठाण रस्त्याचे भूमिपूजन झाले आहे. हेही काम लवकरच पुर्ण होईल.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *