Pimpri Corona News: शहरात आज 164 रुग्णांची नोंद, 139 जणांना डिस्चार्ज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 160 आणि पालिका हद्दीबाहेरील 4 अशा 164 नवीन रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 139 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 88 हजार 582 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 85 हजार 213 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1542 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 639 अशा 2181 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 832 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 836 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील 4 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 6 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात थेरगावातील 38 वर्षीय पुरुष, निगडीतील 61 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 75 वर्षीय महिला, भोसरीतील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, पालिका हद्दीबाहेरील अहमदनगर येथील 47 वर्षीय पुरुष आणि हिंजवडीतील 64 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply