Maval news : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्कृष्ट कार्य- पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर
Pckhabar- मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरोना संकटकाळात मनापासून जनतेची मदत केली, त्याबद्दल सर्वांचे कौतुक त्यांनी केले व यापुढेही जनतेच्या मदतीसाठी तत्पर रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी कार्यकर्त्यांना केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ विधानसभा पदाधिकारी व कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा विवोट्री हॉटेल वडगाव मावळ येथे संपन्न झाला. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष गारटकर बोलत होते. याप्रसंगी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वसामान्यांच्या समस्यांसाठी झटुन काम केले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सर्वांचा विश्वास वाढत आहे. अनेकजण पक्ष प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी एकजूटीने काम केले पाहिजे. आगामी निवडणूका जिंकण्यासाठी लढा, असा निर्धार आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी म्हणून नवनियुक्ती करण्यात आलेल्या सर्व पदाधिकार्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी आमदार शेळके यांनी शुभेच्छा दिल्या. आपल्या पक्षाची ध्येयधोरणे व पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवुन आपण पक्ष संघटना अजुन बळकट करण्याचा प्रयत्न कराल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील मावळ तालुक्यातील विजेत्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply