Chinchwad news : वाहतूक पोलिसाला जिवे मारण्याचा प्रयत्न, चालकाला अटक

Chinchwad news : वाहतूक पोलिसाला जिवे मारण्याचा प्रयत्न, चालकाला अटक
Pckhabar- कारवाईसाठी वाहतूक पोलीस थांबवत असताना पोलिसाचा पाय मोटारीच्या बोनेटमध्ये अडकला. अशास्थितीत माथेफिरू चालकाने मोटार तशीच दामटली. जीव वाचविण्यासाठी पोलीस कर्मचारी बोनेटवर तसेच बसून राहिले. त्याच अवस्थेत सुसाट गाडी पळवत मोटार चालकाने पोलिसाला एक किलो मीटर नेले. यामध्ये पोलीसाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. ही घटना चिंचवडगावात घडली.
आबासाहेब विजयकुमार सावंत असे वाहतूक पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. तर युवराज किसन हनुवते (वय 49, रा. पिंपळे निलख) असे अटक केलेल्या  मोटार चालकाचे नाव आहे. खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा वाहन चालकावर दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडगाव परिसरातील अहिंसा चौक परिसरात चिंचवड वाहतूक शाखेतील पोलीस नाईक  सावंत हे मास्क न लावलेल्या वाहन चालकांवर कारवाई करीत होते. त्यावेळी आरोपी युवराज हनुवते हा त्याच्या मोटारीमधून (एमएच 01,  वाय 8837) तिथे आला. त्याने तोंडाच्या खाली मास्क घेतल्याने पोलिसांनी त्यास मोटार बाजूला घेण्यास सांगितले. मोटार बाजूला घेतो असे म्हणून तो पळून जाण्याचा प्रयत्न करून लागला.  आरोपी मोटार पुढे घेत असताना सावंत यांचा पाय मोटारीच्या बोनेटमध्ये अडकला. आरोपीने मोटार न थांबवता 1 किलोमीटर तशीच पुढे नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *