Pimpri news : 26 नोव्हेंबरला सर्व क्षेत्रातील कामगारांचा राष्ट्रीय संप

Pimpri news : 26 नोव्हेंबरला सर्व क्षेत्रातील कामगारांचा राष्ट्रीय संप
Pckhabar-संसदेच्या मागील अधिवेशनात केंद्र सरकारने प्रचलीत 29 कामगार कायदे रद्द करुन नविन चार कामगार कायदे मंजूर केले. हे कायदे रद्द करुन अगोदरचेच कामगार कायदे अंमलात आणावे. तसेच वित्त आणि संरक्षण क्षेत्रातील खाजगीकरण, कंत्राटीकरण रद्द करावे. या मागणीसाठी देशभरातील सर्व क्षेत्रातील सर्व कामगार संघटनांनी संविधान दिनाच्या दिवशी  दि.26 नोव्हेंबर 2020 राष्ट्रीय संप पुकारला आहे. याची घोषणा पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम यांनी पत्रकार परिषदेत केली.
         श्रमशक्ती भवन आकुर्डी येथे पुणे जिल्हा कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस सीटू संघटनेचे डॉ. अजित अभ्यंकर, इंटकचे मनोहर गडेकर, हमीद इनामदार, एलआयसीचे चंद्रकांत तिवारी, आयटकचे एस. डी. घोडके, अमिल रोहम, एल.एस. मारु, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकळे, राजेंद्र दरेकर, दत्तात्रय येळवंडे, श्रमिक एकता महासंघाचे दिलीप पवार, सीटूचे वसंत पवार, गणेश दराडे आदी कामगार नेते उपस्थित होते.
          डॉ. अजित अभ्यंकर म्हणाले, नवीन कायदे हे कामगारांची सेवा सुरक्षा कधीही काढून घेणारे असून कोणत्याही क्षणी कोणत्याही कारणाशिवाय कामगारांना हाकलून देण्याचे स्वातंत्र्य व्यवस्थापनाला देणारे आहेत. या कायद्यांना तसेच केंद्र सरकारच्या वित्त, विमा, संरक्षण, क्षेत्रातील खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाला तीव्र विरोध आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी 26 नोव्हेंबरला होणार्‍या राष्ट्रीय संपात देशभरातून कोट्यावधी कामगार तर पुणे जिल्ह्यातून तीन लाखांहून जास्त कामगार केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरतील.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *