Dehu news : उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे यांना ‘आदर्श उपसरपंच पुरस्कार’ प्रदान
Pckhabar- विविध सामाजिक आणि लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारे तीर्थक्षेत्र देहूगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे यांना मुंबई येथील जनकल्याण सेवा संस्थेचा आदर्श उपसरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेच्या डॉ. वीणा खाडिलकर, डॉ. पांडुरंग मिसाळ, प्रसिद्ध व्याख्याते प्रा. प्रदीप कदम, डॉ. विजय बालघरे, प्रा. शाहूराज येवते आदी मान्यवर उपस्थित होते.
व्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांनी उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.
उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे यांच्या सामाजिक व लोकाभिमुख कार्याची दखल जनकल्याण संस्थेने घेऊन त्यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सन्मानित केले. मानपत्र वाचन डॉ. वीणा खाडिलकर यांनी केले.
पुरस्काराला उत्तर देताना उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे म्हणाले, उपसरपंच पदाचा वापर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण मनापासून केला आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीत विविध सामाजिक उपक्रम राबविले. आपल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल काळोखे यांनी जनकल्याण सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थित आणि सर्व नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply