Pimpri News: उपमहापौरपदी केशव घोळवे यांची बिनविरोध निवड
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या उपमहापौरपदासाठी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक केशव घोळवे यांची आज (शुक्रवार) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निकिता कदम यांनी माघार घेतली.
उपमहापौर तुषार हिंगे यांनी 14 ऑक्टोबर 2020 रोजी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपमहापौरपद रिक्त झाले होते. त्यासाठी भाजपकडून केशव घोळवे यांनी तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरसेविका निकिता कदम यांनी अर्ज दाखल केला होता.
महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी अकरा वाजता विशेष सभा झाली. यावेळी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निकिता कदम यांनी माघार घेतल्याने घोळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply