Pimpri Corona News: शहरात आज 135 नवीन रुग्णांची नोंद, 124 जण कोरोनामुक्त
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 131 आणि पालिका हद्दीबाहेरील 4 अशा 135 नवीन रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 124 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 88 हजार 422 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 85 हजार 74 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1538 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 637 अशा 2175 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 855 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 616 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 2 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात चिंचवड येथील 73 वर्षीय वृद्ध महिला आणि जुन्नर येथील 70 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply