Khadki news : कँन्टोन्मेंट उपाध्यक्ष पदाचा निर्णय लांबणीवर

Khadki news : कँन्टोन्मेंट उपाध्यक्ष पदाचा निर्णय लांबणीवर
Pckhabar- पदवीधर मतदार संघाची  लागु करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे नुतन कँन्टोन्मेंट उपाध्यक्ष पदा संदर्भात  बुधवारी बोलविण्यात आलेली खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाची विशेष सभा रद्द करण्यात आली. नुतन उपाध्यक्ष निवड प्रक्रीये करिता (9 डिसेंबर आचारसंहिता संपणार) आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याने उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेल्या इच्छुकांमध्ये  नाराजी पसरली आहे.
तत्कालीन उपाध्यक्ष दुर्योधन भापकर यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा 9 आक्टोबर रोजी बोर्डाचे अध्यक्ष ब्रि.एम.जे.कुमार यांच्याकडे दिला होता. त्यानंतर उपाध्यपदी कोणाची निवड होणार? पहिल्या महिला उपाध्यक्ष पदाचा बहुमान सदस्या कार्तिकी हिवरकर यांना मिळणार का?अशा अनेक चर्चेला उधान आले होते. आमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी ही खडकी कँन्टोन्मेंट बोर्ड येथिल पहिल्या महिला उपाध्यक्षपदी निश्चितपणे हिवरकर यांना संधी दिली जाईल असा विश्वास व्यक्त केला होता. बोर्ड अध्यक्ष ब्रि.कुमार हे काही कामानिमित्त बाहेरगावी असल्याने नुतन उपाध्यक्ष पद निवडी करिता बोर्ड सभा घेण्यात अडचण निर्माण झाली होती. ब्रि.कुमार हे नुकतेच कामावर हजर झाले. त्यानंतर नुतन उपाध्यक्ष प्रक्रीया राबविण्या करिता कँन्टोन्मेंट बोर्डाच्या वतिने बुधवारी विशेष सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सध्या पदवीधर मतदार संघ निवडणुक प्रक्रीया राबवली जात असल्याने राज्यात आचारसंहिता लागु करण्यात आली आहे. आचारसंहीतेची मुदत 9 डिसेंबर रोजी संपणार आहे. आचारसंहिता लागु झाल्यामुळे  आयोजित केलेली कँन्टोन्मेट बोर्ड विशेष सभा प्रशासनास रद्द करावी लागली. त्यामुळे नुतन कँन्टोन्मेंट उपाध्यक्ष पदाचा निर्णय ही आणखी महिनाभर लांबणीवर पडला गेला. कँन्टोन्मेंट बोर्डाचा पाच वर्षाचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपुष्ठात आला होता. त्यानंतर दिल्ली संरक्षण मंत्रालयाच्या वतिने दि. 5 फेब्रुवारी रोजी बोर्डास पहिली सहा महिन्याची मुदतवाढ तर दि. 4 आँगस्ट रोजी दुसरी सहा महिन्याची मुदतवाड घोषित केली होती.
दुसरी मुदतवाड 10 फेब्रुवारी 2021 रोजी संपणार आहे. नुतन उपाध्यक्षा करिता भापकर यांनी राजीनामा दिल्यानंतर नुतन उपाध्यक्षास केवळ चार महिन्याचा कालावधी मिळणार होता. मात्र भापकर यांच्या राजीनाम्या नंतर निश्चितवेळेत बोर्ड सभा न झाल्याने तसेच आचारसंहितेमुळे इच्छुक नुतन उपाध्यक्षाचा दोन महिन्यांचा कालावधी कमी होणार आहे. डिसेंबर महिन्यात आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने बोर्ड प्रशासनाने सभा बोलावुन नुतन उपाध्यक्ष प्रक्रीया बाबत निर्णय घेतल्यास ईच्छुक उपाध्यक्षास (10 फेब्रुवारी 2921 पर्यंत) साधारणपणे दोन महिन्याची कारकिर्द मिळेल.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *