Dehugaon news: ग्रामपंचायत प्रभाग रचना जाहीर; 6 प्रभाग असणार

Dehugaon news: ग्रामपंचायत प्रभाग रचना जाहीर; 6 प्रभाग असणार

Pckhabar – तीर्थक्षेत्र देहूगाव ग्रामपंचायतीची प्रभाग रचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकतीच जाहीर केली आहे. सहा प्रभाग निश्चित करण्यात आले असून सदस्यसंख्या 17 असणार आहे. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्याने इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ यापूर्वीच संपला आहे. परंतु, कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर गेली होती. आता अनलॉकमध्ये निवडणूक घेण्यास सुरुवात केली आहे. पाच प्रभागातून प्रत्येकी तीन सदस्य तर प्रभाग क्रमांक तीन मधून दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यानुसार आठ पुरुष व नऊ महिला सदस्य असणार आहेत.

प्रभाग क्रमांक एकमध्ये माळीनगर, बोडकेवाडीचा समावेश आहे. त्यात सर्वसाधारण प्रवर्ग, ओबीसी आणि एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असणार आहे.  देहूगावठानाचा प्रभाग क्रमांक दोनमध्ये समावेश आहे.  प्रभाग क्रमांक तीनमध्ये एसटी स्टँडपासून कंद पाटीलनगर ते गायरान सर्व्हे नंबर 92 या परिसराचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जमाती महिला आणि ओबीसी प्रवर्गासाठी जागा असणार आहे.

प्रभाग क्रमांक चारमध्ये विठ्ठलनगर युनी केअर हॉस्पिटलपासून देहू-आळंदी रस्त्याची डावी बाजू तळवडे शिवपर्यंतच्या संपूर्ण भागाचा समावेश करण्यात आला आहे. तर, प्रभाग पाचमध्ये सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जमाती महिला आणि ओबीसी महिलेसाठी राखीव आहे.
प्रभाग क्रमांक सहामध्ये विठ्ठलनगर देहू आळंदी रस्त्याची उजवी बाजू या भागाचा समावेश आहे. या प्रभागात एक जागा सर्वसाधारण खुला प्रवर्ग, ओबीसी महिला आणि एक जागा महिलेसाठी राखीव असणार आहे.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *