Pcmc news: भाजप नगरसेवकांनी ‘स्थायी’त ग्लास फोडला, फाइल भिरकविली अन् माईकही तोडला

Pcmc news: भाजप नगरसेवकांनी ‘स्थायी’त ग्लास फोडला, फाइल भिरकविली अन् माईकही तोडला
Pckhabar- निवडणूक आचारसंहितेत सभा कामकाज करता येत नसताना चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या तीन नगरसेवकांनी आज (बुधवाकरी) आकांडतांडव केले. स्थायी समितीची सभा तहकूब करण्याचा निरोप आम्हाला का धाडला नाही असा त्रागा करत या नगरसेवकांनी काचेचा ग्लास फोडला, फाइल भिरकविली आणि माईकही तोडला.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली. अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक  जाहीर झाली असून  त्याची आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. पालिका पदाधिकऱ्यांची वाहने काढून घेतली आहेत. दालनावरील पाट्याही उतरविल्या आहेत. असे असताना स्थायी समितीची सभा घ्या असा अट्टहास भाजपच्या काही सदस्यांनी धरला.

सभा कामकाजात उपस्थितांचे स्वागत करत शुक्रवार (दि. 6) पर्यंत सभा तहकूब करत असल्याचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनी जाहीर केले. त्यांनतर भाजप नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांशी वाद घालायला सुरुवात केली. अचानक एका नगरसेवकाने ग्लास फोडला तर दुसऱ्याने फाईल भिरकावली, माईकची तोडफोड केली.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *