Pimpri news : शहरातही भाजपला गळती; महिला ओबीसी मोर्चाच्या शहराध्यक्षा सारिका पवार यांचा राजीनामा
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहर भाजप महिला ओबीसी मोर्चाच्या शहराध्यक्षा सारिका पवार यांनी पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नाथाभाऊ माझे नेते आहेत. त्यांचा संघर्ष हा माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या सन्मानार्थ भाजपचा राजीनामा देत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
भाजप ओबीसी महिला मोर्चाच्या अध्यक्षा असलेल्या सारिका पवार भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. शहरात भाजपची सत्ता नसताना पक्ष संघटनेत सदस्य नोंदणी, विविध आंदोलने, आरोग्य शिबिर, महिलांसाठी विविध प्रशिक्षणे आयोजित केले. महिलांना स्वावलंबी होण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या. पक्ष संघटना वाढविण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले.
परंतु, 2017 च्या पालिका निवडणुकीत एकनाथ खडसे समर्थक असल्यामुळे माझी उमेदवारी कापली असा आरोपही त्यांनी केला. पालिकेत सत्ता आल्यानंतर पक्षाने कार्याची दखल घेतली नाही. तसेच नाथाभाऊ माझे नेते आहेत. त्यांचा संघर्ष माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या सन्मानार्थ भाजपचा राजीनामा देत आहे, असे पवार यांनी सांगितले. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठविला आहे.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply