Pimpri Corona News: शहरात आज 163 नवीन रुग्णांची नोंद, 105 जण कोरोनामुक्त
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 162 आणि पालिका हद्दीबाहेरील 1 अशा 163 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 105 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात आजपर्यंत 88 हजार 291 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 84 हजार 950 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1537 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 636 अशा 2173 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 817 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 766 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
शहरातील 4 जणांचा आज मृत्यू झाला आहे. त्यात दापोडीतील 80 वर्षीय वृद्ध, कासारवाडीतील 62 वर्षीय पुरुष, जाधववाडीतील 58 वर्षीय आणि थेरगावातील 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.










Leave a Reply