Dehu news : समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेसी डेव्हिड, डॉ. शिल्पा फावडे यांचा सन्मान
Pckhabar- देहूगाव परिसरातील कोरोना नियंत्रणासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या समुदाय वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रेसी डेव्हिड यांचा देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सन्मान करण्यात आला.
गेल्या सात ते आठ महिन्यापासून डॉ. डेव्हिड या देहूतील कोविड सेंटरमध्ये कार्यरत होत्या. त्यांना मंगळवारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी शाल, श्रीफळ, संत तुकाराम महाराज यांची गाथा देऊन सन्मान करत निरोप दिला. तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

समुदाय वैद्यकिय अधिकारी डॉ. शिल्पा फावडे यांचे कर्मचाऱ्यांनी शाल, श्रीफळ, गाथा देऊन सत्कार करत स्वागत केले. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply