Pimpri corona News:  शहरात आज 139 नवीन रुग्णांची नोंद, 135 जण कोरोनामुक्त

Pimpri corona News:  शहरात आज 139 नवीन रुग्णांची नोंद, 135 जण कोरोनामुक्त
Pckhabar-  पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 133 आणि पालिका हद्दीबाहेरील 6 अशा 139 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे.  तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 135 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 88 हजार 129 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 84 हजार 845 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1533 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 636 अशा  2169 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 876 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1375 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील 4 आणि महापालिका हद्दीबाहेरील 2 अशा 6 जणांचा आज मृत्यू  झाला आहे. त्यात मोशीतील 65 वर्षीय पुरुष, वाकड येथील 82 वर्षीय पुरुष, ताथवडेतील 53 वर्षीय पुरुष, संगवीतील 60 वर्षीय महिला आणि बीड जिल्ह्यातील 50 वर्षीय पुरुष, खेड येथील 102 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *