Pcmc news: ‘अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेट वस्तू स्वीकारणे पडणार महागात

Pcmc news: ‘अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेट वस्तू स्वीकारणे पडणार महागात

  शिस्तभंगाची होणार कारवाई’, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा इशारा
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेट वस्तू स्वीकारणे महागात पडणार आहे.  नागरिक, ठेकेदार, अन्य कोणत्याही व्यक्ती, अथवा कोणत्याही संस्थाकडून भेटवस्तू, देणग्या स्वीकारु नयेत.  महापालिकेतील  कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी कोणाकडूनही कसल्याही प्रकारची भेटवस्तू स्वीकारल्यास संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर  यांनी दिला आहे. 

महापालिकेमध्ये विविध  क्षेत्रांतील नागरिक येत असतात. कामानिमित्त विविध विभागातील नागरिकांशी संपर्क येतो.  त्यामुळे आपले हितसंबंध जोपासण्यासाठी, प्रेमापोटी, किंवा सणाचे औचित्य साधून नागरिक अधिकाऱ्यांना भेटवस्तू देत असतात. 

बांधकाम परवाना, लेखा  स्थापत्य विभाग, पाणीपुरवठा विभागांमध्ये   दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध भेटवस्तू येण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. परंतु, भेटवस्तू स्वीकारणे लोकाभिमुख प्रशासनासाठी बाधक आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांने त्यांचाशी  कार्यालयीन व्यवहार असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून, औद्योगिक किंवा वाणिज्य संस्थाकडून  संगटनांकडून वारंवार केला जाणारा पाहुणचार टाळवा.  भेटवस्तू , देणगी स्वीकारल्याचे आढळून आल्यास संबंधितावर शिस्तभंगाची कडक कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *