Dehu news : साहेबराव बोडके यांच्या वाढदिवसानिमित्त 60 आदिवासी विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

Dehu news : साहेबराव बोडके यांच्या वाढदिवसानिमित्त 60 आदिवासी विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप
Pckhabar- देहूगाव येथील कर्तव्य फाऊंडेशनचे सदस्य साहेबराव बोडके यांच्या जन्मदिनानिमित्त किवळे, आंदर मावळ येथील आदिवासी व ठाकर समाजाच्या 60 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी कर्तव्य फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

साहेबराव बोडके म्हणाले, कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे अनेक नागरिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.  सध्या ऑनलाईन शाळा सुरू असल्यातरी काही दिवसांनी प्रत्यक्षात शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मावळातील आदिवासी आणि ठाकर समाजातील गरजू 60 विद्यार्थ्यांना वाढदिवसाचे औचित्य साधून स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले आहे.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *