Pimpri corona news: शहरातील सुमारे साडे आठ लाख नागरिकांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील 33.9 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे. सुमारे साडे आठ लाख नागरिकांमध्ये अँटिबॉडीज (प्रतिपिंड) विकसित झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याबाबतची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी – चिंचवड महापालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज अॅण्ड रिसर्च सेंटर यांच्यावतीने केलेल्या अॅण्टीबॉडीज चाचणी म्हणजेच ‘सार्स कोवी – 2 सर्वेक्षण’तून ही निरीक्षणे समोर आली आहेत. 7 ते 17 ऑक्टोबर 2020 दरम्यान 10 पथकाच्या माध्यमातून हा सर्व्हे करण्यात आला. 5 हजार व्यक्तींच्या रक्त नमुन्यांची शास्त्रीय तपासणी करण्यात आली आहे. त्यासाठी शहरात 200 क्लस्टर निर्माण करण्यात आले होते. झोपडपट्या, गावठाण, बैठी घरे, गृहनिर्माण संस्था यांचा समावेश होता. प्रत्येक विभागातून असे एकूण 5 हजार नमुने तपासण्यात आले.
झोपडपट्टीमधील 37.8 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला आहे. गावठाण, बैठी घरे, चाळीतील 38.3 टक्के आणि हाऊसिंग सोसायटीतील 27.7 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे. 51 ते 65 वयोगटातील नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात अँटीबॉडी आढळून आल्या असून त्याचा दर 35.5 टक्के इतका आहे. किशोरवयीन 12 ते 18 वर्षांच्या मुला मुलींमध्ये 34.9 टक्के, 29 ते 30 वयोगटामध्ये 29.7 टक्के, 35 ते 50 वयोगटातील लोकांमध्ये 31.2 टक्के तर 66 वर्षांपुढील नागरिकांमध्ये 28.2 टक्के अँटीबॉडी आढळल्या आहेत, असे आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply