Pimpri News: उपमहापौरपदी केशव घोळवे यांची निवड निश्चित  

Pimpri News: उपमहापौरपदी केशव घोळवे यांची निवड निश्चित
 
Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून मोरवाडीचे प्रतिनिधित्व करणारे केशव घोळवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

अर्ज दाखल करताना महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक एकनाथ पवार आदी उपस्थित होते.

महापालिकेत भाजपचे बहूमत असल्याने घोळवे यांची निवड निश्चित मानली जात असून  6 नोव्हेंबर 2020 रोजी शिक्कामोर्तब होईल.
उपमहापौर तुषार हिंगे यांनी 14 ऑक्टोबर  2020 रोजी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपमहापौरपद रिक्त झाले आहे. त्यासाठी आज (सोमवारी)  दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे होते. भाजपकडून  कामगार नेते केशव घोळवे यांनी अर्ज दाखल केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची निविर्विदा सत्ता आहे.  त्यामुळे भाजपचा उपमहापौर होणार हे निश्चित आहे. भाजपचे तब्बल 76 नगरसेवक आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे 34, शिवसेना 9, मनसे 1 आणि अपक्ष 5 असे 125 नगरसेवक आहेत. अपक्ष नगरसेवक भाजपशी सलंग्न आहेत.

6 नोव्हेंबर 2020 रोजी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी अकरा वाजता विशेष सभेत ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *