Dehuroad news : देहूरोड परिसरात ‘गुंडाराज’; व्यापारी, नागरिक भयभीत

 

Dehuroad news : देहूरोड परिसरात ‘गुंडाराज’; व्यापारी, नागरिक भयभीत
Pckhabar- देहूरोड परिसरात गेल्याकाही महिन्यांपासून गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. शहरात पोलीस व कायद्याचा धाक न उरल्याने शहरातील गुंड प्रवृत्तीचे ‘भाई’ सर्वसामान्य नागरिक तसेच व्यापार्‍यांना धाक दाखवून लुटत आहे. अशाच्या एका गुंडाचा एका व्हिडीओ व्हायरल झाला असून
शस्त्राचा धाक दाखवून गुंडांनी दोन कापड व्यावसायिकांकडून सुमारे 20 हजारांचे नवीन कपडे जबरदस्तीने घेऊन गेले.

देहूरोड शहरातील आंबेडकर नगर, शितळा नगर, एम बी कॅम्प, पारसी चाळ या सारख्या झोपडपट्टी असलेल्या भागात दररोज गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, हप्ते वसुली अशा घटनांमुळे देहूरोड शहर पूर्णपणे हादरून गेले आहे.

दोन दिवसांपूर्वी थॉमस कॉलनी येथील व्यापारी महिला तसेच तिच्या पतीला हप्ता न दिल्याच्या कारणावरून गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच देहूरोड बाजारपेठेत जीवे मारण्याची धमकी देत शस्त्राचा धाक दाखवून गुंडांनी दोन कापड व्यावसायिकांकडून सुमारे 20 हजारांचे नवीन कपडे जबरदस्तीने घेऊन गेले. दुकानातील असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घडलेला दहशतीचा प्रकार रेकॉर्ड झाला आहे.

दररोज घडत असणाऱ्या अशा घटनांमुळे मेन बाजार, पारशी चाळ येथील व्यापारी भयभीत झाले आहेत. सशस्त्र असणाऱ्या गुंडांकडून जीवाचे बरे वाईट होऊ नये, या भीतीने व्यापारी त्यांच्या विरोधात बोलण्यासही धजावत नाहीत.
देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *