Pimpri news: कोरोनाबाधित रुग्णांना श्वसनाचा त्रास; फटाके विक्रीस बंदी घालण्याची मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती मागणी
Pckhabar- कोरोना महामारीने थैमान घातले आहे. अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना आजार अद्यापही संपलेला नाही. राज्याबरोबरच पिंपरी चिंचवड शहरात ही फटाके स्टॉलला फटाके विक्रीसाठी परवानगी देऊ नये. विक्रीवर बंदी घालावी, फटाक्यांमुळे जेष्ट नागरिक, लहान मुले, गरोदर महीला व कोरोना सारख्या आजारी व्यक्तीना फटाक्यांच्या प्रदूषणामुळे श्वासनाचा त्रास होतो, फुफ्फुसा संबंधीत आजारात वाढ होते. शहराच्या प्रदूषणात वाढ होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होतो. अनेक पशुपक्षांना जिव गमवावा लागतो, त्यामुळे फटाके विक्रीस बंदी घालण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीतर्फे मुख्यमंत्री, पोलीस आयुक्तांकडे यांच्याकडे केली आहे.
सध्या कोरोना आजार शहरात आटोक्यात आणण्यासाठी कोरोना योद्धे जिवाची बाजी लावून प्रयत्न करत आहेत व त्यांना यश येतांना दिसत आहे. फटाक्याच्यां प्रदूषणामुळे इतर आजार होण्याची भीती निर्माण होते.
चीन सारखा विश्वास घातकी देश फटाक्यांद्धारे व इतर वस्तूच्या माध्यमातून व्हायरस पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून फटक्याबरोबर चायनीज वस्तू वरही बंदी घालण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी मुख्यमंत्रीउध्वव ठाकरे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कडे निवेदनातून केली आहे.
संस्थापक विकास कुचेकर म्हणाले, नागरिकांनीही फटाके वाजु नये, व्यर्थ पैशाचा अपव्यय करु नये .गरीब नागरिकांना मदत करण्याचे त्यांनी आवाहन केले.
विनेदनावर संस्थाध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्याक्षा संगिता जोगदंड, अँड सचिन काळे, मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply