Pimpri corona News: अनेक दिवसानंतर शहरात आज एकही मृत्यू नाही!

Pimpri corona News: अनेक दिवसानंतर शहरात आज एकही मृत्यू नाही!
166 नवीन रुग्ण, 232 जण कोरोनामुक्त

Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 146 आणि पालिका हद्दीबाहेरील 20 अशा 166 नवीन रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली आहे.  शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 87 हजार 740 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 232 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील एकाचाही आज कोरोनामुळे मृत्यू झाला नाही.

शहरात आजपर्यंत 87 हजार 740 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 84 हजार 478 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1527 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 632 अशा  2159 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 859 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1269 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील एकाचाही आज कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. गेल्या अनेक दिवसानंतर आज पहिल्यांदाच एकही मृत्यू झाला नाही. हे आशादायक चित्र आहे. महापालिका हद्दीबाहेरील 2 जणांचा आज मृत्यू  झाला आहे. त्यात जुन्नर येथील 67, 67 वर्षीय दोन पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *