Dehu news : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी श्री संत तुकाराम महाराजांना साकडे

Dehu news : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी श्री संत तुकाराम महाराजांना साकडे

Pckhabar- उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची लवकरात लवकर प्रकृती सुधारावी यासाठी आज (शनिवार) देहु येथे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवतीच्या वतीने तीर्थक्षेत्र देहू श्री संत तुकाराम महाराज चरणी साकडे घातले. त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

राज्यात गेले आठ महिने कोरोना च्या आजाराने अनेक जण त्रस्त आहेत. सर्वसामान्यांचे लॉकडाऊन आणि अन्य कारणामुळे मोठे हाल झाले. याच काळात राजकीय प्रतिनिधी व केंद्रीय मंत्री तसेच अभिनेते यांचाही आजाराने  मृत्यू झालाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही नुकतीच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सुधारून लवकरच नव्याने लोकसेवेत दाखल व्हावेत अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

यावेळी पिंपरी-चिंचवड  राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा वर्षा जगताप, 
पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा गीता मोरे (इमानदार),
चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा रुतुजा बिराजदार,
सारिका धामे उपस्थित होत्या.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *