Pimpri corona news: बघा आपल्या भागात कोरोनाचे किती ॲक्टीव्ह रुग्ण?
Pckhabar-पिंपरी-चिंचवड पालिकेच्या ‘ब’ प्रभाग कार्यालय हद्दीतील रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड परिसरात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 325 सक्रिय रुग्ण आहेत. तर, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात सर्वात कमी म्हणजेच कोरोनाचे 138 रुग्ण आहेत.
क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या!
‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात सर्वात कमी म्हणजेच 138 सक्रिय रुग्ण आहेत.
‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात सर्वाधिक म्हणजेच 325 सक्रिय रुग्ण आहेत.
‘क’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे 157 रुग्ण आहेत.
‘ड’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे 207 सक्रिय रुग्ण आहेत.
‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात 270 रुग्ण आहेत. प्रभागातील रुग्णसंख्या तीन हजाराच्या पुढे गेली होती. आता नियंत्रणात आली आहे.
‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे 207 रुग्ण आहेत.
‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे 165 सक्रिय रुग्ण आहेत.
‘ह’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात कोरोनाचे 164 सक्रिय रुग्ण आहेत. एकूण 3348 सक्रिय रुग्णांवर कोविड केअर सेंटर, महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, महापालिकेने शुक्रवारी (दि.30) रात्री दिलेल्या नकाशानुसारची ही आकडेवारी आहे. शहरातील 1 हजार 633 सक्रिय रुग्णांवर पालिका रुग्णालय, सीसीसी सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील रुग्णसंख्या 87 हजार 594 झाली आहे. शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून शहरातील 87 हजार 594 जणांना कालपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 84 हजार 246 जणांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे. तर, खासगी रुग्णालये, होम आयसोलेशन असे 3 हजार 348 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील 1527 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्या 630 अशा 2157 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply