Pimpri corona News: शहरात 182 नवीन रुग्ण, 315 जण कोरोनामुक्त, 3 मृत्यू

Pimpri corona News: शहरात 182 नवीन रुग्ण, 315 जण कोरोनामुक्त, 3 मृत्यू

Pckhabar-  पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 173 आणि पालिका हद्दीबाहेरील 9 अशा 182 नवीन रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली आहे.  उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 315 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आजपर्यंत 87 हजार 433 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 84 हजार 125 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1526 जणांचा तर शहराबाहेरील  परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणार्‍या 627 अशा  2153 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 911 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 800 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

शहरातील 3 जणांचा आज मृत्यू  झाला आहे. त्यात काळेवाडीतील 60 वर्षीय पुरुष, दिघीतील 83 वर्षीय पुरुष, पिंपरीतील 69 वर्षीय पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *