Maharashtra news : एसटीची हंगामी तिकीट दरवाढ रद्द

Maharashtra news : एसटीची हंगामी तिकीट दरवाढ रद्द

Pckhabar- दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष  अनिल परब यांनी दिली आहे. 

कोरोनामुळे अधिच एसटी महामंडळ तोट्यात आहे. कोरोनाच्या भितीमुळे अनेक नागरिक एसटीने प्रवास करण्यास धजावत नाहीत. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार आहे, अशी माहिती मंत्री परब यांनी दिली.

महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *