Talegaon news : मावळात भात पिकाच्या कापणीस सुरुवात
Pckhabar- मावळ तालुक्यात मान्सूनच्या परतीच्या पावसाने विश्रांती घेताच तालुक्यातील खरीप भात पिकाच्या भात कापणीस शेतकर्यांनी जोरदार सुरुवात केली आहे. तर एकाच वेळी भात कापणीची सुरुवात झाल्याने कापणीसाठीचे मजूर मिळणे शेतक-यांना अवघड झाले आहे.
यावर्षी मान्सूनच्या परतीच्या जोरदार पावसामुळे खरीप भात पिकांचे अखेरच्या टप्प्यात मोठे नुकसान झालेले आहे. भात खाचरामध्ये प्रचंड पाणी साठलेले आहे. तर काही ठिकाणी भात खाचरात तयार झालेली भात पिक आडवे पडून नुकसान झाले आहे.
मावळ तालुका हा अति पावसाळी तालुका असून या तालुक्यात खरीप भाताचे पीक सर्वाधिक घेतले जाते. यंदा तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांच्या अहवालानुसार १२ हजार ७०० हेक्टरवर भात पिक घेण्यात आलेले आहे.
यावर्षी खरीप भात पिकाच्या लागवडीच्या काळात मान्सूनचा पाऊस चांगला आणि मुबलक झाल्याने तालुक्याच्या १०४ टक्के भात पिकाच्या लागवडी झाल्या तर भात पिकाच्या वाढी नुसार वेळो वेळी चांगला पाऊस झाला. त्यामुळे खरीप भात पिक अतिशय जोमात आले होते. त्यामुळे शेतकरीही आनंदी झाला होता. मात्र मान्सूनच्या परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने कापणीस आलेल्या भात पिकाचे काही ठिकाणी फार मोठे नुकसान झाले आहे.
भात पिकाच्या कापणीच्या काळातच मान्सूनचा परतीचा पाऊस पडल्याने भात खाचरा मध्ये पाणी साठले असून भात कापणी करणे अवघड झालेले आहे. तर भात कापणी एक वेळी असल्याने भात कापणी कारणा-या मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
महत्त्वाचा बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply